शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हप्ताखोरीचा व्हिडिओ प्रकरण ‘मॅनेज’साठी ठाणेदारांची धावपळ; पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘हजेरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:43 IST

हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या; परंतु एसपींनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला.

बीड : हप्ताखोरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड ग्रामीणचे ठाणेदार अशोक मुदिराज यांची नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली असली, तरी आता हे प्रकरण ‘मॅनेज’ करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंगळवारी (दि. १०) तक्रारदार आणि मुदिराज या दोघांनाही समोरासमोर बोलावून त्यांची कडक शब्दांत ‘हजेरी’ घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यात कारवाई अटळ असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुदिराज यांनी पाली परिसरातील एका हॉटेलचालकाकडे मासिक हप्त्याची मागणी केली होती. या संभाषणाचा व्हिडिओ पुराव्यासह अधीक्षकांकडे सादर झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या; परंतु एसपींनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला. मंगळवारी झालेल्या चौकशीत तक्रारदार हॉटेलचालकाचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला असून, मुदिराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक साेमनाथ जाधव यांच्याकडे सध्या बीड ग्रामीणची धुरा आहे. यापूर्वी त्यांनाही कर्मचाऱ्याने लाच घेतल्याने नियंत्रण कक्षात घेतले होते.

कारवाईची टांगती तलवारअपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी अत्यंत गोपनीय आणि वेगाने सुरू आहे. मुदिराज यांना ठाण्यातून हटवून नियंत्रण कक्षात जमा केल्याने त्यांचे अधिकार काढले गेले आहेत. आता चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होते की केवळ बदलीवर हे प्रकरण शांत केले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तक्रारदार हेदेखील वादात?ज्या हॉटेलचालकाने तक्रार केली आहे, त्यांच्या हॉटेलवर यापूर्वी बीड ग्रामीण पोलिसांनीच छापा मारला होता. यावेळी काही जोडपे येथे आढळले होते. त्यात पुढे काय कारवाई झाली, हे मात्र, पोलिसांनी दडपले होते. आता पुन्हा याच हॉटेलवाल्यानेच पैसे मागितल्याचा व्हिडिओ बनवून एसपींकडे दिला आहे. त्यामुळे मुदिराज यांच्यासोबतच आता हा हॉटेलवालाही वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

गजानन क्षीरसागर यांच्या चौकशीचे काय झाले?शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्यावर एका सराफा व्यापाऱ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. सुरुवातीला तक्रार देणाऱ्या व्यापाऱ्याने नंतर 'यू-टर्न' घेत माघार घेतली. मात्र, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत क्षीरसागर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी करून चौकशी लावली होती. या घटनेला आता महिना उलटूनही चौकशीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांच्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने संभ्रम वाढला असून, या चौकशीचे पुढे काय झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खरे की खोटे लवकर कळेलचौकशी सुरू झाली आहे. आम्हाला पोलिस अधीक्षकांनी चौकशीच्या अनुषंगाने बोलावले होते. माझ्यावरील आरोप खरे की खोटे, हे माझ्या जबाबात देईल.अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष

चौकशी सुरू केलीमाझ्याकडे चौकशी असून, ती सुरूदेखील केली आहे. चौकशीअंती जे निष्पन्न होईल, त्याचा अहवाल पोलिस अधीक्षकांना दिला जाईल. आताच यावर काही बोलणे, उचित ठरणार नाही.सचिन पांडकर, पोलिस अधीक्षक, बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Bribery video goes viral; police inspector investigated, superintendent intervenes.

Web Summary : A bribery video led to the transfer of Police Inspector Mudiraj. Superintendent Kanwat summoned both Mudiraj and the complainant hotelier for questioning. An investigation is underway, potentially leading to suspension. A previous similar case involving Inspector Kshirsagar remains unresolved, raising questions.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी