शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीच्या पाहणीसाठी आमदारांनी सांभाळले ट्रॅक्टरचे स्टेरिंग, पण चिखलात पडले अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 19:12 IST

जोरदार पाऊस आणि चिखलामुळे ट्रॅक्टर अडकल्याने आमदार आणि अधिकाऱ्यांना काही काळ अडकून पडावे लागले. 

- नितीन कांबळे कडा (बीड) :बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. आष्टी तालुक्यात तर सोलेवाडी, पांढरी येथे गुरूवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या भागात यात मोठ्या प्रमाणावर शेती आणि पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली. मात्र, एका ठिकाणी आ. आजबे यांचे ट्रॅक्टर चिखलात अडकले. यामुळे अधिकाऱ्यांसह आमदारांना भर पावसात चिखलात अडकून पडावे लागले होते.

ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आमदार बाळासाहेब आजबे, उपविभागीय अधिकार प्रमोद कुदळे, तहसीलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, यांच्यासह मंडळधिकारी, तलाठी गेले होते. याचवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सोलेवाडी येथील नदीला पाणी आले. 

पाणी वाढत जात असल्याने तेथून मार्ग काढत शेतकऱ्यांना भेटीस जाने  शक्य नव्हते. यावेळी तेथील ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेत स्वतः आमदार आजबे पुढे निघाले. सोबतचे अधिकारी देखील त्यात बसले. मात्र, काही अंतर पार करताच चिखलात ट्रॅक्टर अडकले. धोधो कोसळणारा पाऊस आणि चिखलात अडकलेले ट्रॅक्टर अशा परिस्थितीत आमदार आणि अधिकाऱ्यांना काही वेळ तसेच बसून राहावे लागले. काही वेळाने आमदारांनी आपले कसब दाखवत ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांसह आमदार पुढील पाहणीसाठी निघून गेले. 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसFarmerशेतकरीMLAआमदार