पशुवैद्यक पदविकाधारक बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:29+5:302021-07-18T04:24:29+5:30
महाराष्ट्रात पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये खासगी पशुसंवर्धन पशुवैद्यक पदविकाधारक हे शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या बांधावर जाऊन, डोंगर, दरी, खोऱ्यात, उन्ह, पाऊस, वाऱ्याची ...

पशुवैद्यक पदविकाधारक बेमुदत संपावर
महाराष्ट्रात पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये खासगी पशुसंवर्धन पशुवैद्यक पदविकाधारक हे शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या बांधावर जाऊन, डोंगर, दरी, खोऱ्यात, उन्ह, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगत रात्रंदिवस पशुवैद्यकीय सेवा पुरवत आहोत. शासनाचे लसीकरण, टॅगिंग, शिबिरे, पशुगणना व कृत्रिम रेतन यासारखे महत्त्वाची कामे करून घेतात. नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सगळा देश लॉकडाऊन झाला असताना आम्ही पशुवैद्यक पदविकाधारक अत्यावश्यक सेवा पुरवत होतो. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद यांच्याकडे पशुसंवर्धन पदविकाधारक यांची कायदेशीर नोंदणी करावी, पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदावर फक्त पदविकाधारकांनाच प्राधान्य देण्यात यावे. २०१२ पासून पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून तीन वेळेस भरती प्रक्रिया काढून बेरोजगार युवकांकडून परीक्षा शुल्क भरून घेतले, पण एकही पद भरले नाही, यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या मान्य कराव्या नाहीतर मोठे आंदोलन उभारण्याच्या इशारा या खासगी पशुवैद्यक संघटनेने दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बबन नेहरकर, अशोक पाचपुते, बप्पाजी नागरगोजे, रोहिदास काकडे, शरद जायभाय, भारत शिंदे, सागर गवळी ,कृष्णा जाधव, परमेश्वर बटुळे, गणेश सातपुते, हनुमान खेडकर, तात्यासाहेब मांडवे, सागर शेळके, आकाश खेडकर, संजय भराटे, कृष्णा येवले, आदींनी तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत.