धारूर महाविद्यालयात पशुचिकित्सा शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:28+5:302021-07-18T04:24:28+5:30
शिबिरात डॉ. बी. आर. तंबरे, डॉ. डी. आर. कंठाळे तसेच एम. एस. अंबाड, आर. जी. पारवे, एच. डी. तुंबाड, ...

धारूर महाविद्यालयात पशुचिकित्सा शिबिर
शिबिरात डॉ. बी. आर. तंबरे, डॉ. डी. आर. कंठाळे तसेच एम. एस. अंबाड, आर. जी. पारवे, एच. डी. तुंबाड, पी. के. खुडे, पशुधन पर्यवेक्षक यांनी या पशुचिकित्सा शिबिरात मोठ्या संख्येने बैल, शेळ्या, गाय, म्हैस, आदी पशूंची तपासणी करून औषधोपचार केले. १०७ पशूंची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी शिबिरासाठी उपस्थित असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन कर्मचारी व पशुपालकांचे स्वागत केले. या पशुचिकित्सा शिबिर कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, कार्यक्रमाचे संयोजक विस्तार विभागाचे डॉ. संजय जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. डी. एन. गंजेवार, प्रा. गोविंद बावस्कर, डॉ. आर. आर. भोसले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व धारूर परिसरातील पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
170721\1422-img-20210717-wa0083.jpg
धारुर महाविद्यालयात आयोजित पशू चिकीत्सा शिबीर