कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:58+5:302021-03-10T04:33:58+5:30
कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात झाली. सरपंच पती अनिल ढोबळे यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचे ...

कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात झाली. सरपंच पती अनिल ढोबळे यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्राचार्य डॉ एच जी विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन मोरे, कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल आरबे, डॉ जोगदंड, रघुनाथ कर्डीले, राजेश राऊत, राजेंद्र तांगडे, नितीन कांबळे, संजय खंडागळे, बाबूसेठ भंडारी, अनंतराव देशमुख यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कडा येथे दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी हे लसीकरण होईल. ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींनी आधीच्या आजाराचे डॉक्टरांचे पत्र आणावे. ६० वर्षावरील व्यक्तींनी आधार कार्ड झेरॉक्स घेऊन यावे असे डॉ आरबे यांनी सांगितले.
===Photopath===
090321\nitin kmble_img-20210309-wa0049_14.jpg
===Caption===
कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू झाले.