आजोळ परिवारातील सदस्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:53+5:302021-05-24T04:31:53+5:30

शिरूर कासार : आजोळ परिवारातील सर्व सदस्यांचे शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाकडून ...

Vaccination of Ajol family members | आजोळ परिवारातील सदस्यांचे लसीकरण

आजोळ परिवारातील सदस्यांचे लसीकरण

शिरूर कासार : आजोळ परिवारातील सर्व सदस्यांचे शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाकडून माणुसकीचे दर्शन घडले. दिव्यांग व वयस्कर आजोबांना थेट टेम्पोत येऊन लस दिली गेली.

राक्षस भुवन येथील आजोळ परिवाराच्या आश्रयाला असणारे दिव्यांग, वृध्द आजोबांना लसीकरणासाठी ‘आजोळ’चे संचालक कर्ण तांबे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वाहनाने आणले होते. या लसीकरणात सहभागी असलेल्या शिक्षकांनी त्या गाडीचे भाडे देऊन सेवाधर्म निभावला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खाडे यांच्यासह बडे सिस्टर, शिल्पा बनकर, एस. पी. डब्लू गाडे, नागरे यांनी थेट टेम्पोजवळ येऊन ज्यांना पायऱ्या चढता येत नाहीत, अशा वयस्कर व दिव्यांग आजोबांना थेट जागेवर जाऊन लस दिली. लखुळ मुळे, नितीन कैतके, कातखडे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

===Photopath===

230521\vijaykumar gadekar_img-20210522-wa0066_14.jpg

===Caption===

आजोळ परिवारातील सदस्यांचे लसीकरण

Web Title: Vaccination of Ajol family members