शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी घसरल्याने ऊसतोड मुकादम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

माजलगाव : साखर कारखान्यास पट्टा पडल्याने घर जवळ करण्यासाठी निघालेला ऊसतोड मुकादम दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जागीच ...

माजलगाव : साखर कारखान्यास पट्टा पडल्याने घर जवळ करण्यासाठी निघालेला ऊसतोड मुकादम दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर खरात आडगाव फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.

परमेश्वर शिवाजी घाटे (२७, रा. कापडसिंगी ता. सेनगाव, जि. हिंगोली) हा ऊसतोडणी मुकादम वडवणी तालुक्यातील ख. लिमगाव या शिवारात आपल्या टोळीसह ऊसतोडणीचे काम करत होता. साखर कारखान्याचा पट्टा पडल्याने ही टोळी राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणमवरून ट्रकमधून आपल्या गावी कापडसिंगीकडे निघाली होती. तर, परमेश्वर घाटे दुचाकीवरून ट्रकच्या मागेपुढे प्रवास करत गावाकडे निघाला होता. दरम्यान, माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव फाट्याजवळ परमेश्वर घाटे यांची दुचाकी अचानक घसरली व फरफटत जाऊन रस्त्याच्या बाजूला किलोमीटर दर्शवणाऱ्या दगडावर घाटे यांचे डोके जोरात आदळले. त्यामुळे मोठा रक्तस्राव होऊन घाटे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या मृत्यूप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला.