दुर्दैवी ! मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 15:45 IST2021-06-02T15:42:12+5:302021-06-02T15:45:04+5:30

गोदावरी पात्रात कपडे धुताना आई, मुलगी आणि चुलत बहिण बुडाल्या

Unfortunately! The mother and sister also drowned while trying to save the girl, incident from Beed | दुर्दैवी ! मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही बुडून मृत्यू 

दुर्दैवी ! मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही बुडून मृत्यू 

गेवराई : तालुक्यातील मिरगाव येथील गोदावरी पात्रात कपडे धुण्यासाठी आलेल्या आई, मुलगी आणि पुतणीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. माहितीनुसार, पाण्यात बुडणाऱ्या मुलीला वाचविताना आई आणि चुलत बहिणी यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि तिघींचाही बुडून मृत्यू झाला.

याबद्दल अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मिरगाव येथील रंजना भागवत गोडबोले ( ३२ ) या बुधवारी सकाळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलगी अर्चना ( १२ ) आणि पुतणी शीतल हनुमान गोडबोले ( १२) यांच्यासोबत घेऊन गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.  यावेळी मुलगी अर्चना पोहण्यासाठी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली गेली. तिला वाचविण्यासाठी रंजना आणि शीतल यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, तिघींही पाण्यात बुडाल्या.

याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदी पात्राकडे धाव घेऊन तिघींना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मिरगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली. तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Unfortunately! The mother and sister also drowned while trying to save the girl, incident from Beed