दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मुलीसह वडील आणि चुलत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:27 IST2020-07-13T13:25:08+5:302020-07-13T13:27:07+5:30

कट झालेल्या वायरचा शिडीला स्पर्श झाल्यामुळे त्यामध्ये वीजप्रवाह उतरला

Unfortunately ! Girl killed with Father and uncle by electric shock | दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मुलीसह वडील आणि चुलत्याचा मृत्यू

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मुलीसह वडील आणि चुलत्याचा मृत्यू

ठळक मुद्दे बीड शहरातील गोविंदनगर भागातील घटना

बीड : उघड्या वायरचा स्पर्श लोखंडी शिडीला झाला होता. त्यावरून जात असताना मुलीला विजेचा धक्का बसला तिला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा व चुलत्याचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी १२ वाजेच्या दरम्यान शहरातील गोविंदनगर भागात घडली.

श्रेया तुळशीराम वडमारे (७), तुळशीराम वडमारे, चुलते रमेश वडमारे असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. गोविंदनगर भागात छोटी घरं आहेत. तसेच परिसरात वीजपुरवठा करण्यासाठी असलेली व्यवस्था देखील फक्त 2 पोलवरून आहे. सर्वांच्या घरावरून वीज जोडणीचे वायर गेलेले आहेत. रविवारी पाऊस झाल्यामुळे परिसरात ओलावा होता त्यामुळे कट झालेले वायरचा शिडीला स्पर्श झाल्यामुळे त्यामध्ये वीजप्रवाह उतरला यामुळे ही घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांमधून सांगितले जात आहे. 

घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली, त्यांनंतर वीजप्रवाह खंडित करण्यात आला. तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आले होते. दरम्यान विजेचा प्रवाह कुठून कसा उतरला याचा शोध महावितरणचे अधिकारी कर्मचारी घेत आहेत.

Web Title: Unfortunately ! Girl killed with Father and uncle by electric shock