स्थानकात अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST2021-01-18T04:31:05+5:302021-01-18T04:31:05+5:30

रस्त्यांवरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बसस्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व अ‍ॅटो रिक्षा ...

Uncleanliness in the station | स्थानकात अस्वच्छता

स्थानकात अस्वच्छता

रस्त्यांवरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बसस्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व अ‍ॅटो रिक्षा यांचे पार्किंग केले जाते. अगोदरच हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते. त्यातच प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

सायबर गुन्ह्यांत वाढ

अंबाजोगाई : तालुक्यात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुम्हाला बक्षीस लागले असे मेसेज करून नागरिकांना भुलवले जाते. पुन्हा तुमच्या बँकेच्या खात्यातून या क्रमांकावर टॅक्सची इतकी रक्कम भरा. तुम्हाला मोठी रक्कम तत्काळ उपलब्ध होईल, अशा क्लृप्त्या लढवत नागरिकांना गंडविले जात आहे.

अपुरे कर्मचारी

अंबाजोगाई : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना पुरेशा सुविधा देण्यासाठी पालिकेकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणामी, शहरातील विविध भागांत नागरी समस्या वाढत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर कामे करण्याचे आदेश द्यावेत व तत्काळ उपायांची मागणी आहे.

Web Title: Uncleanliness in the station