शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

कालव्यात पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:18 PM

जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी त्यांची मृतदेह कालव्यात आढळून आली

गेवराई  ( बीड ) : जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी त्यांची मृतदेह कालव्यात आढळून आली . रविवारी रात्रभर त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. महेश गणेश बहिर (१७ ) व  राम चंद्रकांत भिताडे (१८) असे मृत युवकांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, गंगावाडी येथील महेश बहिर व  राम भिताडे  हे दोघे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राक्षसभुवन जवळील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले. सध्या कालव्यात धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येथील पाण्याची पातळी वाढलेली असून ते प्रवाही आहे. यामुळेच पाण्यात उतरताच त्याचा वेग जास्त असल्याने ते दोघे पाण्यात वाहुन गेले.

याबाबत माहिती मिळताच पोलीस व गावकऱ्यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नव्हते. आज सकाळी ६ च्या सुमारास त्यांची कपडे ज्या ठिकाणी होती तेथेच त्यांची मृतदेह आढळून आली. सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांनीही नुकतीच १२ वीची परीक्षा दिली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीStudentविद्यार्थी