ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:07 PM2021-10-16T13:07:40+5:302021-10-16T13:08:32+5:30

वाघळूज घाटात ट्रक- दुचाकीची वळणावर समोरासमोर धडक झाली

The two-wheeler was crushed in the collision of the truck; On the day of Dussehra, a young man on a two-wheeler was killed on the spot | ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

Next

कडा ( बीड ) :  वाघळुज घाटात ट्रक- दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. मकरंद भालेकर ( ३०, रा. शेरी बुद्रुक ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील युवक मकरंद भालेकर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास कड्यावरून नगरकडे दुचाकीवर चालला होता. दरम्यान, अहमदनगरवरून जामखेडकडे एक ट्रक ( MH 16 AY 8586 ) येत होता. दोन्ही वाहनांची वाघळूज घाटातील वळणावर समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील मकरंद याचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी जोरात होती की यात दुचाकीचा चुराडा झाला आहे. ऐन दसरा सणाच्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: The two-wheeler was crushed in the collision of the truck; On the day of Dussehra, a young man on a two-wheeler was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app