परळी येथे पेट्रोल पंपावरील धुमाकुळ प्रकरणी २ आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:16 IST2017-12-14T19:15:28+5:302017-12-14T19:16:08+5:30
संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

परळी येथे पेट्रोल पंपावरील धुमाकुळ प्रकरणी २ आरोपीस अटक
परळी (बीड) : संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
परळी - बीड रस्त्यावरील व औ. वि. केंद्राच्या इमारतीजवळ विजयकुमार मेनकुदळे यांचा रिलायन्स पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास काही तरुणांनी तोडफोड केली होती. यात पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक दत्ता गुळवे यांचा पाय फॅक्चर होता. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. यानंतर घटनास्थळास पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी भेट देऊन तातडीने आरोपीचा शोध घेणे सुरू केले. या प्रकरणात एकुण सहा आरोपी असून त्यापैकी दोघांना आज अटक करण्यात आली. तर फरार आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली. पोलिसांनी अटक आरोपीचे नावे जाहीर केली नाहीत.