इंग्रजीच्या पेपरला दोन कॉपीबहाद्दर पकडले, ९८० विद्यार्थ्यांची दांडी
By अनिल भंडारी | Updated: March 6, 2023 18:41 IST2023-03-06T18:40:51+5:302023-03-06T18:41:05+5:30
बीड जिल्ह्यात दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला दोन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले.

इंग्रजीच्या पेपरला दोन कॉपीबहाद्दर पकडले, ९८० विद्यार्थ्यांची दांडी
बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना गेवराई दोन विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध बोर्डाकडे कारवाई प्रस्तावित करण्यात आली, तर ९८० विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
जिल्ह्यातील ६५२ शाळांतील ४२ हजार ४८० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत. १५६ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. परीक्षेदरम्यान गेवराईत येथील महात्मा फुले विद्यालयाच्या शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी व भगवान सोनवणे यांच्या भरारी पथकाने दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडून बोर्डाकडे कारवाई प्रस्तावित केली.