आईसोबत कपडे धुण्यास गेलेल्या दोन बहिणी गोदावरी पात्रात बुडाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 14:20 IST2021-08-28T14:19:36+5:302021-08-28T14:20:01+5:30
गोदावरी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे. यामुळे पात्रात मोठे खड्डे पडले आहेत.

आईसोबत कपडे धुण्यास गेलेल्या दोन बहिणी गोदावरी पात्रात बुडाल्या
गेवराई ( बीड ) : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. नेहा ( ९ ) व अमृता धर्मराज कोरडे ( ८ ) असे मृत मुलींचे नावे आहेत.
तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद माडला आहे. गोदावरी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे. यामुळे पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. आज दुपारी आईसोबत कपडे धुण्यासाठी नेहा आणि अमृता या चिमुकल्या गोदावरी पात्रात गेल्या होत्या. पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी बहिणी वाळू उपस्यामुळे पडलेल्या खड्यात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढण्यात आले.