एसपींच्या घरात गांजा पिणारा अन् वाळू माफियाला मदत करणारे दोन पोलिस सेवेतून बडतर्फ

By सोमनाथ खताळ | Updated: May 6, 2025 21:40 IST2025-05-06T21:38:51+5:302025-05-06T21:40:55+5:30

Beed News: वाळू माफियाला पळून जाण्यासाठी मदत करणारा आणि पोलिस अधीक्षक यांच्या घरातच गांजा ओढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली.

Two policemen who smoked ganja at SP's house and helped sand mafia dismissed from service | एसपींच्या घरात गांजा पिणारा अन् वाळू माफियाला मदत करणारे दोन पोलिस सेवेतून बडतर्फ

एसपींच्या घरात गांजा पिणारा अन् वाळू माफियाला मदत करणारे दोन पोलिस सेवेतून बडतर्फ

- सोमनाथ खताळ
बीड - वाळू माफियाला पळून जाण्यासाठी मदत करणारा आणि पोलिस अधीक्षक यांच्या घरातच गांजा ओढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली. रामप्रसाद शिवनाथ कडूळे आणि बाळू गहिनीनाथ बहिरवाळ असे बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

बहिरवाळ यांची पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून नियूक्ती होती. रविवारी रात्री साडे आठ वाजता तो एका खोलीत गांजा पित होता. एसपींच्या बॉडीगार्डने त्याला रंगेहाथ पकडले होते. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर कडुळे हे पिंपळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्यावर एसीबीची कारवाई झाली होती. यात त्यांचे निलंबन झाले.

तीन महिन्यांनी सेवेत येताच पुन्हा एकदा याच पोलिस ठाणे हद्दीतील गोरख काळे या वाळू माफियाला मदत करताना काही पुरावे सापडले होते. त्यामुळे कडुळे यांना सह आरोपी करून अटकही केली होती. या दोन्ही प्रकरणाने पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. हाच धागा पकडून या दोन्ही कर्मचाऱ्यांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले आहे.

Web Title: Two policemen who smoked ganja at SP's house and helped sand mafia dismissed from service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.