शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस घातला दोन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:23 AM

दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेच्या समोर घडली.

ठळक मुद्देबीडमधील घटना : बँकेबाहेर बतावणी करत रोखीसह दागिने लांबविले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘तुमच्या मुलावर मोठे संकट येणार आहे. हे संकट कमी करायचे असेल तर तुमच्या अंगावरील सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवा. ती पर्स आमच्याकडे द्या अन दहा पावले कुलदेवतेचा जप करत जाऊन परत या. मुलाची सगळी संकटे टळतील’ अशी बतावणी करून दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेच्या समोर घडली.सुशिला पुरुषोत्तम कुलकर्णी (६९, रा. तिरुपती कॉलनी, बीड) असे सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे नाव आहे. बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी त्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शिवाजीनगर शाखेमध्ये गेल्या होत्या. तेथील काम झाल्यानंतर बँकेच्या प्रवेशद्वारातून त्या बाहेर पडल्या. याच दरम्यान एक अनोळखी व्यक्ती तिथे आला. ‘मी हरिद्वारचा आहे’ अशी ओळख करून देत त्याने कुलकर्णी यांना एका महिलेचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी मला पत्ता माहिती नसल्याचे सांगितले. ते दोघे बोलत असतानाच आणखी एक अनोळखी व्यक्ती तिथे आला. ‘मला माझ्या घरात सुनेपासून त्रास आहे, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा’ असे तो म्हणाला.तेव्हा पहिल्या अनोळखी व्यक्तीने दुसऱ्यास तुझ्याकडील सर्व सोन्याच्या वस्तू कुलकर्णी यांच्याकडे दे व दहा पाऊले मारुतीचा जप करत पुढे जा, असे सांगितले. त्यानुसार त्या दुसºया व्यक्तीने त्याच्याकडील वस्तू काढून देत तो दहा पावले पुढे जाऊन परत आला. अगदी याच पद्धतीने पहिल्या भामट्याने सुशीला कुलकर्णी यांनाही अशीच बतावणी केली. ‘तुम्हाला तीन मुले आहेत. तुमच्या लहान मुलावर मोठे संकट येणार आहे. हे संकट मी कमी करतो व मुलाला सुखी करतो. त्यासाठी तुमच्याकडील सर्व दागिने तुमच्या पर्समध्ये ठेवा व ती पर्स माझ्या सहकाºयाकडे द्या आणि कुलदेवतेचा जप करत दहा पावले पुढे जाऊन परत या’ असे सांगितले. त्या दोन्ही भामट्यावर विश्वास ठेवत सुशीला कुलकर्णी यांनी आपल्याकडील २२ हजाराची रक्कम, १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे दागिने, घरून सोबत आणलेली रक्कम असा एकूण २ लाख २ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांच्या स्वाधीन केला आणि कुलदेवतेचा जप करत त्या पुढे गेल्या. मात्र त्या परत येईपर्यंत दोन्ही भामटे तेथून पसार झाले होते. हे पाहून कुलकर्णी यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून सर्व कैफीयत पोलिसांसमोर मांडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी