आष्टी, पाटोद्यातील दोन मुख्याध्यापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:05 IST2019-04-12T00:04:18+5:302019-04-12T00:05:12+5:30
लाच घेताना रंगेहात पकडलेल्या पाटोदा तालुक्यातील वाहली येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ लाड आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता तसेच रजेचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर आढळून आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद केंद्रांतर्गत चाटगोठे येथील मुख्याध्यापक सुधाकर कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले.

आष्टी, पाटोद्यातील दोन मुख्याध्यापक निलंबित
बीड : लाच घेताना रंगेहात पकडलेल्या पाटोदा तालुक्यातील वाहली येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ लाड आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता तसेच रजेचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर आढळून आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद केंद्रांतर्गत चाटगोठे येथील मुख्याध्यापक सुधाकर कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ही कारवाई केली.
पाटोदा तालुक्यातील वाहली येथील जि. प. कें. प्रा. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ लाड यांना वेतनवाढीच्या संचिकेवर स्वाक्षरी करुन ती लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ एप्रिल रोजी रंगेहात पकडले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. लाचेची मागणी करुन ती स्विकारणे महाराष्टÑ जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियमांचा भंग करणारी कृती असल्याने प्रभारी मुख्याध्यापक लाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांना निलंबन काळात धारुर गटशिक्षणाधिकारी कार्यालय मुख्यालय दिले आहे.
सीईओंच्या पाहणीत मुख्याध्यापक गायब
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे हे ३ एप्रिल रोजी आष्टी तालुक्यात दौºयावर होते. खिळद केंद्रांतर्गत चाटगोठे येथील जि. प. प्राथमिक शाळेची त्यांनी अचानक तपासणी केली.
त्यावेळी या शाळेतील विद्यार्थी एकाच खोलीमध्ये बसविण्यात आले होते. तेथे एक शिक्षिका अध्यापन करत होती. शाळेत २७ पैकी केवळ ८ विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुधाकर भगवान कुलकर्णी हे वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता तसेच रजेचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुख्याध्यापक कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी खुलासा दिला नाही.
अनधिकृतपणे गैरहजर राहणे, खुलासा सादर न करणे, शैक्षणिक कामात निष्काळजीपणा करणे आदी कारणांवरुन मुख्याध्यापक कुलकर्णी यांचे निलंबन केले असून निलंबन काळात त्यांना शिरुर गटशिक्षणाधिकारी कार्यालय मुख्यालय देण्यात आले आहे.