भरदिवसा वाटमारी करणारे दोेघे जेरबंद, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:24+5:302021-08-22T04:36:24+5:30
गेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा वाहने अडवून चालकांना धमकावत लूटमार करणाऱ्या दोघांना महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी ...

भरदिवसा वाटमारी करणारे दोेघे जेरबंद, एक फरार
गेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा वाहने अडवून चालकांना धमकावत लूटमार करणाऱ्या दोघांना महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांचा एक साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता रांजणी (ता.गेवराई) शिवारात करण्यात आली.
विक्की दत्तात्रय आठरे (२८,रा.आसरानगर पाथर्डी, जि.नगर), नितीन सुभाष जगताप (२७ रा.नवीन कावसान, ता.पैठण, जि.औरंगाबाद) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश भाबड (२५,रा.आगसखांड, ता.पाथर्डी, जि.नगर) हा फरार झाला आहे. हे तीनही आरोपी २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी परिसरामध्ये वाहने अडवून चालकांना धमकावून पैशाची मागणी करत असल्याची माहिती नितीन विजय वाणी या टेम्पोचालकाने पाडळसिंगी टोलनाक्यावर असणाऱ्या महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर महामार्ग विभागाचे सहायक निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तातडीने पोलीस अंमलदारांना रांजणीकडे रवाना केले. यावेळी वरील आरोपींनी काही गाड्या अडवून ठेवल्याचे दिसून आले. यातील विक्की व नितीन यांना ताब्यात घेताच गणेशने पलायन केले. पकडलेल्या दोघांकडून दुचाकी (एमएच १५ इएल-८०५६) जप्त केली. पकडलेल्या दोघांनाही गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी दिली.
.....
210821\21bed_13_21082021_14.jpg~210821\21bed_14_21082021_14.jpg
दुचाकी~आरोपी