गेवराईत रान डुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:07 IST2018-06-25T17:04:09+5:302018-06-25T17:07:59+5:30
तालुक्यातील तळवटबोरगावं येथे शेतात काम करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर रानडुकराने अचानक हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेवराईत रान डुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी
गेवराई (बीड ) : तालुक्यातील तळवटबोरगावं येथे शेतात काम करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर रानडुकराने अचानक हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारोती गायकवाड ( 45 ) व परमेश्वर काळे ( 55) असे या शेतकऱ्यांची नावे आहेत. हि घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मारोती गायकवाड व परमेश्वर काळे हे दोघे रविवारी सकाळी 11 वाजेच्या तळवटबोरगावं येथे नदी काठावरील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटने नंतर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी अमोल सातपुते याच्यां आदेशाने वन अधिकारी शिवाजी काबंळे यांनी जखमीची भेट घेतली. तसेच जखमींना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात येईल असे काबंळे यांनी यावेळी सांगितले सांगितले.