शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:41 AM

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील सात वर्षात तब्बल १३०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जनजागृती, योजनांचा लाभ दिला जात असतानाही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आत्महत्या रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी तर पावसाळा संपत आला तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. रिमझीम पावसावरच पेरण्या झाल्या. थोड्याफार झालेल्या पावसावर पिके कसे बसे जगविले.खत, फवारणी हजारो रूपये खर्च केले. मात्र, एवढे असतानाही दुष्काळी परिस्थितीमुळे अद्यापही पीके जोमात आलेले नाहीत. त्यामुळे केलेला खर्च निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातूनच ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे.२०१३ ते १३ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यात १३०३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ३०१ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या आहेत. २००४ ते २०१८ पर्यंत १८१५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. पैकी १२०६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत तर ६०९ प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आलेलीआहेत.४०३२ शेतकरी तणावग्रस्तजिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून शेतकरी तणावाखाली आहेत का, याची माहिती घेतली जाते. मागील सहा महिन्यात ३ लाख ४६ हजार ७२७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ४ हजार ३२ शेतकरी तणाग्रस्त आढळले आहेत.त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून समुपदेशन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले, डॉ.मुजाहेद, परिचारिका विजया शेळके, अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे, शीतल टाक, महेश कदम, तांदळे हे यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSocialसामाजिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्जdroughtदुष्काळ