पोखरी शिवारात वीज कोसळून दोन बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:17+5:302021-05-10T04:34:17+5:30

अंबाजोगाई : तालुक्यात रविवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात पोखरी शिवारात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्घटना घडली. ...

Two bulls were killed in a lightning strike in Pokhari Shivara | पोखरी शिवारात वीज कोसळून दोन बैल ठार

पोखरी शिवारात वीज कोसळून दोन बैल ठार

अंबाजोगाई : तालुक्यात रविवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात पोखरी शिवारात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्घटना घडली. यात शेतकऱ्याचे एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथील शेतकरी बंडू कुलकर्णी यांच्याकडे चार बैल आहेत. त्यातील दोन बैल लिंबाच्या झाडाखाली बांधले होते. दोन बैलाने शेतात मशागत सुरू होती. रविवारी दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने कुलकर्णी यांचा गडी कुळवाचे बैल सोडून गोठ्याकडे धावत येत होता. त्याचवेळी विजेचा कडकडाट झाला. विजेच्या कडकडाटात शेतात बांधलेले दोन बैल जागेवरच ठार झाले. यात या शेतकऱ्याचे एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी बंडू कुलकर्णी यांनी दिली आहे. या घटनेचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला आहे.

Web Title: Two bulls were killed in a lightning strike in Pokhari Shivara