बीडमध्ये दोन भावांचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: May 4, 2017 03:56 IST2017-05-04T03:56:34+5:302017-05-04T03:56:34+5:30

मळमळ - उलट्या होऊन दोन चिमुकल्या भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी

Two brothers suspicious death in Beed | बीडमध्ये दोन भावांचा संशयास्पद मृत्यू

बीडमध्ये दोन भावांचा संशयास्पद मृत्यू

बीड : मळमळ - उलट्या होऊन दोन चिमुकल्या भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली. त्यांची आईसुद्धा अत्यवस्थ आहे. फळातून विषबाधा झाल्याने या प्रकार घडल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे, तर हा सर्पदंश असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यामुळे दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. साई भारत शिंदे (२) व ओम भारत शिंदे (५) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते झोपले. बुधवारी पहाटे झोपेतच दोघांनाही मळमळ व उलट्या होऊ लागल्या. तसेच त्यांची प्राजक्ता हिलाही त्रास होऊ लागला. तिघांनाही सकाळी सहा वाजता शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ओमला मृत घोषित केले, तर सात तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर साईनेही अखेरचा श्वास घेतला. प्राजक्ता यांचीही प्रकृती खालावली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two brothers suspicious death in Beed