धारूर घाटात धावत्या टिप्परने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:18 IST2018-10-28T00:17:37+5:302018-10-28T00:18:11+5:30
शॉर्टसर्किटमुळे आग लागून धावत्या टिप्परचा (एमपी ३९ एच. १०९०) समोरील भाग जळाल्याची घटना शनिवारी दुपारी धारूर घाटात घडली.

धारूर घाटात धावत्या टिप्परने घेतला पेट
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : शॉर्टसर्किटमुळे आग लागून धावत्या टिप्परचा (एमपी ३९ एच. १०९०) समोरील भाग जळाल्याची घटना शनिवारी दुपारी धारूर घाटात घडली. यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनेनंतर तात्काळ पाण्याचे टँकर मागवून आग आटोक्यात आणण्यात आली.
यामध्ये टिप्परेच मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही जखम झाली नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. त्यानंतर पोलीस दाखल झाले.