ट्रक-पिकअपचा अपघात; चार जण जागीच ठार, मांजरसुंबा-पाटोदा मार्गावरील घटना
By सोमनाथ खताळ | Updated: January 12, 2024 22:03 IST2024-01-12T22:03:18+5:302024-01-12T22:03:53+5:30
हा अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला.

ट्रक-पिकअपचा अपघात; चार जण जागीच ठार, मांजरसुंबा-पाटोदा मार्गावरील घटना
बीड : अहमदपूर-अहमदनगर या महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा मधील ससेवाडी गावाजवळ पिकअप आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. यात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही काही लोक वाहनांखाली अडकल्याची शक्यता असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून ग्रामस्थांच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
हा अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला. अपघात कसा झाला? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. नेकनूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. तीन मृतदेह बाहेर काढून नेकनूरच्या रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी कटर व इतर साहित्य मागविल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक नितीन गुट्टूरवार यांनी दिली.