अनैतिक संबंधाच्या संशयावरून माजलगावात ट्रक चालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:24 IST2018-05-26T23:24:53+5:302018-05-26T23:24:53+5:30

Truck driver's murder in Majalgaon on suspicion of immoral relations | अनैतिक संबंधाच्या संशयावरून माजलगावात ट्रक चालकाचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयावरून माजलगावात ट्रक चालकाचा खून

माजलगाव : तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील शेख बुरान शेरखान पठाण (३०) या ट्रक चालकाचा मृतदेह शनिवारी गावाशेजारील शेतात आढळून आला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून मनूरवाडी येथील दाम्पत्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


शेख बुरान याचा मृतदेह फुले पिंपळगाव शिवारातील टवानी यांच्या शेतात पडलेला होता. मायताचा भाऊ सकाळी प्रात:विधीसाठी त्या शेतात गेला असता त्याला प्रकार दिसला. मृतदेहावर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्याने हा प्रकार खून असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मायताचा भाऊ पठाण खदीर शेरखान पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत शेख बुरान याचे मनूरवाडी येथील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

तो त्या महिलेशी फोनवर तासन्तास बोलत होता. हे त्या महिलेच्या पतीला माहीत झाल्याने त्याने शेख बुरान याला घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे अखिला सय्यद गुलाब, सय्यद गुलाब सय्यद दगडू यांनीच माझ्या भावाचा खून केल्याची फिर्याद दिली. यावरून दोघांविरोधात शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजीव तळेकर हे करीत आहेत.

 

Web Title: Truck driver's murder in Majalgaon on suspicion of immoral relations