बीड जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:22 IST2019-02-24T00:21:35+5:302019-02-24T00:22:15+5:30
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांच्या बदल्या
बीड : पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बीड जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत, तर सहा पोलीस निरीक्षक बीड जिल्ह्यात आले आहेत. शुक्रवार आणि शनिवारी अशा दोन दिवसांत बदल्या झालेल्या सर्व ठाणेदारांना बीडमधून कार्यमुक्त केले. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी नवीन ठाणेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे अंबाजोगाई शहर, महादेव राऊत अंबाजोगाई ग्रामीण, सोमनाथ गित्ते अंबाजोगाई शहर ते सुरक्षा शाखा, बाळासाहेब पवार संभाजीनगर परळी, बाळासाहेब बडे गेवराई, संतोष पाटील बीड शहर, सपोनि मारुती मुंडे तलवाडा अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
नागरिकांशी समन्वय ठेवून निवडणूका शांततेत पार पाडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
तीन ठाणे अद्यापही रिक्तच
केज, पेठबीड आणि परळी ग्रामीण येथील ठाणेदारांच्याही बदल्या झालेल्या आहेत. परंतु अद्याप येथे नवीन ठाणेदार नियुक्त केलेले नाहीत. सोमवारपर्यंत येथे त्यांची नियुक्ती होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.