एएसपी भोर यांची बदली, कविता नेरकर यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST2021-09-10T04:41:26+5:302021-09-10T04:41:26+5:30

बीड/अंबाजोगाई : उपअधीक्षक, अप्पर अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर ९ सप्टेंबर रोजी निघाले. अंबाजोगाईच्या अप्पर अधीक्षक स्वाती भोर ...

Transfer of ASP Bhor, appointment of Kavita Nerkar | एएसपी भोर यांची बदली, कविता नेरकर यांची नियुक्ती

एएसपी भोर यांची बदली, कविता नेरकर यांची नियुक्ती

बीड/अंबाजोगाई : उपअधीक्षक, अप्पर अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर ९ सप्टेंबर रोजी निघाले. अंबाजोगाईच्या अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांची अहमदनगर जिल्ह्यात बदली झाली असून, त्यांच्या जागी पुण्याहून कविता नेरकर येत आहेत. सोबतच आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी अभिजित फस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गृहविभागाने ९ सप्टेंबर रोजी अप्पर अधीक्षक दर्जाच्या ५४ आणि उपअधीक्षक पदाच्या ९२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. अंबाजोगाईच्या अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांची बदली श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे करण्यात आली. त्यांच्या जागी पुणे येथील लोहमार्ग विभागाच्या अप्पर अधीक्षक कविता नेरकर यांची नियुक्ती झाली. आष्टीचे विजय लगारे आता रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उपअधीक्षक म्हणून काम पाहतील. त्यांच्या जागी अभिजित फस्के यांची नेमणूक झाली असून, ते सध्या बार्शी येथे उपअधीक्षक होते.

090921\09bed_14_09092021_14.jpg

कविता नेरकर

Web Title: Transfer of ASP Bhor, appointment of Kavita Nerkar