लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:45 IST2019-07-25T23:44:55+5:302019-07-25T23:45:41+5:30
तालुक्यातील नाथापूर येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
बीड : तालुक्यातील नाथापूर येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
येथील रहिवासी बाळू उर्फ अंकुश महादेव लटपटे याने येथील एका मुलीला प्रेमाच्या जाळ््यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले होते. तीन महिन्यापूर्वी लग्न करु, असे सांगत तिला पुणे येथे पळवून नेले होते. तेथे खोली करुन एकत्र राहिले. त्यानंतर दोघांचे लग्नावरुन खटके उडू लागले. अंकुशने लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीने गावी परत येत, पिंपळनेर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लटपटे विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक झिंझुर्डे करत आहेत.