थरारक ! कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकने घेतला पेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 15:01 IST2020-12-30T15:00:00+5:302020-12-30T15:01:17+5:30

नागरिकांनी पाण्याने आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला 

Thrilling! A truck full of cotton took the fire | थरारक ! कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकने घेतला पेट 

थरारक ! कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकने घेतला पेट 

ठळक मुद्देमजूर कापूस भरत असताना ट्रकवरील विद्युत वाहिनीत अचानक स्पार्किंग झाली.

आष्टी : तालुक्यातील कडा येथे कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची थरारक घटना बुधवारी ( दि. ३० ) दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. ट्रकवरील विद्युत वाहिनीत स्पार्किंग झाल्याने ही आग लागली. आगीमुळे ट्रकमधील कापसाने क्षणार्धात पेट घेतला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शैलेश कुमार गांधी यांचे आडत दुकान आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथे ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम सुरु होते.  मजूर कापूस भरत असताना ट्रकवरील विद्युत वाहिनीत अचानक स्पार्किंग झाली. यामुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र नागरिकांनी प्रसंगवधान राखून पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. वेळीच आग विझल्याने पुढील अनर्थ टळला. तरीही यात २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

Web Title: Thrilling! A truck full of cotton took the fire

टॅग्स :fireBeedआगबीड