थरारक ! निझामबाद - पंढरपूर रेल्वेत तरुणावर पाठलाग करत जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 15:52 IST2017-11-13T15:51:28+5:302017-11-13T15:52:36+5:30
निझामबाद - पंढरपूर रेल्वेत गंगाखेडजवळ काल रात्री एकावर पाठलाग करत चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

थरारक ! निझामबाद - पंढरपूर रेल्वेत तरुणावर पाठलाग करत जीवघेणा हल्ला
परळी (बीड ) : निझामबाद - पंढरपूर रेल्वेत गंगाखेडजवळ काल रात्री एकावर पाठलाग करत चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर पलायन करण्यात यशस्वी झाला असून परळी पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गंगाखेडहुन पंढरपूर कडे निघालेल्या निझामबाद - पंढरपूर या रेल्वेतून राजेश्वर त्रिंबक गौरशेटे हे गंगाखेड येथून प्रवास करत होते. यावेळी त्यांचा एकजण पाठलाग करत रेल्वेच्या डब्ब्यात आला. साधारण रात्री १० वाजता रेल्वे परळीजवळ असताना त्याने राजेश्वर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. हल्यात चाकू राजेश्वर यांच्या मांडीत घुसल्याने त्यांना मोठी जखम झाली आहे.
रेल्वे परळीत स्थानकावर आली असता राजेश्वर यांच्यावर शासकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथे हलविण्यात आले आहे. यानंतर परळी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोंधाने व उपनिरीक्षक हबीब पठाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, ऍड गिरीश नरवणे, बाळू चौधरी यांनी रेल्वेतील सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे असून याची कसून तपासणी करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.