बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालीजवळ असलेल्या कोळवाडी गावाजवळ शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी ५.१५ च्या सुमारास डिझेलच्या टँकरने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे. भर रस्त्यावर वेगात असलेल्या या टँकरने आग घेतल्यामुळे परिसर हादरला आणि स्फोटाच्या भीतीने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.
पेट्रोल पंपाकडे जाणारे टँकर क्षणात झाले कोळसापेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन जाणारे हे टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर अज्ञात कारणांमुळे पेटले. भररस्त्यावर धावत्या टँकरने आग घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली. टँकरमध्ये डिझेलचा मोठा साठा असल्याने आग प्रचंड वेगाने वाढली. डिझेलमुळे टँकर अक्षरशः जळून खाक झाला आणि परिसरात स्फोट होण्याची भीती होती. या भीषण आगीमुळे रस्त्यालगतची झाडेही पेटली, ज्यामुळे परिसरात धुराचे आणि आगीचे मोठे लोट पसरले होते.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1158486209785789/}}}}
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A diesel tanker caught fire near Kolwadi, Beed, causing widespread panic. The tanker, en route to a petrol pump, exploded, engulfing the area in flames and smoke. Firefighters and police responded quickly. No casualties reported so far; investigation underway.
Web Summary : बीड के कोळवाड़ी के पास एक डीजल टैंकर में आग लगने से दहशत फैल गई। पेट्रोल पंप जा रहा टैंकर फट गया, जिससे इलाके में आग और धुआं फैल गया। दमकलकर्मी और पुलिस तुरंत मौके पर पहुंचे। अभी तक किसी के हताहत होने की खबर नहीं है; जांच जारी है।