पाच ठिकाणी चोऱ्या करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST2021-05-15T04:32:47+5:302021-05-15T04:32:47+5:30
धारूर : शहरात ३० एप्रिल रोजी रात्री झालेला पाच चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व धारूर पोलीस करत ...

पाच ठिकाणी चोऱ्या करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
धारूर : शहरात ३० एप्रिल रोजी रात्री झालेला पाच चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व धारूर पोलीस करत होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी मुद्देमालासह तीन आरोपी ताब्यात घेतले असून, या आरोपींकडून अंबाजोगाई व वडवणी येथील चोरीची प्रकरणेदेखील उघडकीस आली आहेत.
माकनसिंग शेरसिंग टाक, मोहनसिंग मोहब्बत सिंग (दोघे रा. वडवणी) व अजितसिंग बावरी (रा. प्रसादनगर, ता. पाथरी), अशी अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत. धारूर येथे एकाच दिवशी झालेल्या पाच चोरीच्या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व धारूर पोलीस करत होेते. याप्रकरणी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. या चौकशीत त्यांनी धारूरसह अंबाजोगाई व वडवणी याठिकाणीदेखील चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना वडवणी व अंबाजोगाई पोलिसांच्यादेखील ताब्यात देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर ठाणेप्रमुख पोनि. सुरेखा धस, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.