शिराळ्यात तीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST2021-05-07T04:35:35+5:302021-05-07T04:35:35+5:30

भाऊसाहेब विलास आजबे (रा. आजबे वस्ती, शिराळा ता.आष्टी) यांनी गर्मी जास्त होत असल्यामुळे घराचे दरवाजे उघडे ठेवून ते ...

Three lakh stolen in Shirala | शिराळ्यात तीन लाखांची चोरी

शिराळ्यात तीन लाखांची चोरी

भाऊसाहेब विलास आजबे (रा. आजबे वस्ती, शिराळा ता.आष्टी) यांनी गर्मी जास्त होत असल्यामुळे घराचे दरवाजे उघडे ठेवून ते झोपले होते. घराचे उघडे दार पाहून चोरट्यांनी त्यांच्या घरात पहाटेच्या दरम्यान प्रवेश केला. आजबे यांच्या घरात काही दिवसांपूर्वी लग्न झालेले होते. त्यामुळे खरेदी केलेले दागिने व रोख रक्कम त्यांनी घराच्या लाकडी कपाटात ठेवले होते. चोरट्यांनी त्या कपाटातील ३ लाख ५ हजार रुपयांचे दागिने व रोख ३५ हजार रुपये असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आष्टी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान, सपोनि भरत मोरे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि भर मोरे हे करत आहेत.

Web Title: Three lakh stolen in Shirala