कारमध्ये घरगुती गॅस भरताना तिघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:12 IST2019-04-24T00:12:16+5:302019-04-24T00:12:45+5:30
घरगुती गॅस ओमिनी कारमध्ये भरताना चालक, मालकासह अन्य एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड शहरातील जालना रोडवर एका पेट्रोलपंजावळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली.

कारमध्ये घरगुती गॅस भरताना तिघांना बेड्या
बीड : घरगुती गॅस ओमिनी कारमध्ये भरताना चालक, मालकासह अन्य एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड शहरातील जालना रोडवर एका पेट्रोलपंजावळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली.
गणेश सोनाजीराव गवळी (३३) व अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना एका कारमध्ये घरगुती गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी ही कारवाई केली. कारवाईत कार, गॅस टाकी, गॅस भरण्याची मशीन असा ५६ हजार रूप्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेले तिघे आणि मुद्देमाल बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शहर ठाण्यात नोंद करून याचा अहवाल पुरवठा विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रामकृष्ण सागडे, रेवननाथ दुधाने, गणेश नवले, पांडुरंग देवकते, जयराम उबे, अंकुश वरपे आदींनी केली.