गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघा भावांची घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 16:45 IST2021-02-25T16:38:56+5:302021-02-25T16:45:59+5:30
माजलगाव तालुक्यातील शिवाजीनगर तांड्यावर झाली घटना

गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघा भावांची घरे जळून खाक
माजलगाव : तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन घर जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. ही तिन्ही घरे सख्ख्या भावांची आहेत.
या बाबत माहिती अशी की, मोगरा गावाजवळ असणाऱ्या शिवाजीनगर तांडा येथे घरगुती गॅस सिलेंडरला अचानक आग लागली. क्षणार्धात रौद्ररूप धारण करून आग बाजूच्या दोन घरांमध्ये पसरली.
माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काही वेळातच शेजारीशेजारी असणारी तीनही घरे जळून राख झाली. महसूल पथकाने तीनही घरांची पंचनामे केली आहेत. आगीत तीनही घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.