शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

बीड जिल्ह्यात तीन अपघात; पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:24 IST

भरधाव कार झाडावर आदळून तिघांचा, तर केज व परळी तालुक्यात दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. या तीन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल पाच जण ठार झाले. शुक्रवारी रात्री हे अपघात घडले.

ठळक मुद्देशुक्रवार ठरला घातवार : तीन मृतांमध्ये इंदोरचे व्यापारी, चालकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भरधाव कार झाडावर आदळून तिघांचा, तर केज व परळी तालुक्यात दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. या तीन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल पाच जण ठार झाले. शुक्रवारी रात्री हे अपघात घडले.गढी, माजलगावमार्गे व्यापारी कारमधून लातूरकडे निघाले होते. याचदरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर कार आदळली. यात सुरेश परमानंद हरयानी (४०), चालक रोहित रामप्रसाद मीना (२३), हेमंत नंदकिशोर राजपूत (५५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गवरील टाकरवण फाट्याजवळ घडली. मयत सर्व मध्यप्रदेशातील इंदौरमधील कारटूज कॉलनीतील रहिवासी आहेत. व्यापारी हे इंदौर येथून बीड येथील व्यापाऱ्यांकडे कामानिमित्त आले होते. बीडनंतर गेवराईला जाऊन त्यांनी काम आटोपून रात्री ते मुक्कामासाठी लातूर येथे जात होते. गढी, माजलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून जात असताना त्यांची कार (एमपी ०९ पीपी ४६८३) टाकरवण फाट्यावर आली तेव्हा वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात गाडीतील तिघेही जागीच ठार झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माजलगाव ग्रामीण ठाण्याचे फौजदार सोमनाथ नरके, विकास दांडे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. उत्तरीय तपासणीनतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ग्रामीण ठाण्यात नोंद झाली आहे.नाथ्राजवळ टेम्पोने उडविले दुचाकीस्वारालापरळी -सिरसाळा मार्गावर नाथ्रा फाटा येथे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान माल वाहतूक करणाºया टेम्पोने दुचाकीला (एमएच २३ आर २०७७) जोराची धडक दिली. यात मंगेश सोळंके (२४) हा तरुण ठार झाला तर त्याचा चुलतभाऊ पांडुरंग उर्फ पप्पू रामकिसन सोळंके (२३) हा गंभीर जखमी झाला. ते परळीहून हिंगणी (ता. धारुर) येथे आपल्या गावी जात होते. नाथ्रा फाट्यावर त्यांच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली. यात मंगेशचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंगवर उपचार सुरु आहेत. टेम्पो ताब्यात घेतला असून, चालकाने पोबारा केला. परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद आहे.धारुर रस्त्यावर दुचाकी ट्रॉलीवर आदळून तरूण ठारकेज-धारुर रस्त्यावर भवानी माळाजवळ शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दुचाकीला (एमएच ४४ एल-२६०३) ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक बसली. यात वाजेद जिलानी अतार (वय १९, रा. धारूर) व त्याचा मित्र अरबाज दस्तगीर शेख (वय २०, रा. बीड) हे जखमी झाले. शुक्रवारी रात्री ते धारूरहून केजकडे जात होते. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाईला घेऊन जाताना वाजेद अतार याचा वाटेत मृत्यू झाला, तर अरबाज शेख याच्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू