बीड : शक्तीचे रूप म्हणजेच स्त्री, संकटांचा संयमाने सामना करून कुटुंबात स्थैर्य ठेवणारी म्हणजेच स्त्री, परिवारात सर्वांना समानतेची वागणूक देणारी म्हणजेच स्त्री. असे प्रतिपादन जन शिक्षण संस्थानच्या उपाध्यक्ष मनीषा कुलकर्णी यांनी केले.
जन शिक्षण संस्थान, धान फाउंडेशन व कॅनरा बँकद्वारा आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी धान फाऊंडेशनच्या बचत गटांना व जन शिक्षण संस्थानच्या सहा प्रशिक्षणार्थींना मुद्रा योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयाचे कर्ज मंजुरीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी कॅनरा बँकेचे व्यवस्थापक दीपक वायाळ, दीनदयाल शोध संस्थान, शालेय समितीच्या सचिव डॉ. सीमा जोशी, जिल्हा रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सोनम जायभाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंब प्रबोधन विभागाचे तात्या देशपांडे यांचे मार्गदर्शन झाले. व्यासपीठावर डॉ. नीलेश गोल्हार, ॲड. अर्चना तुंगार, अनिता वजुरकर, नीलम पाटील या उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. नीलेश गोल्हार व डॉ. सोनम जायभाय यांच्या सहकार्याने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी जन शिक्षण संस्थान, दीनदयाल शोध संस्थान व धान फाऊंडेशनमध्ये कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संचालक गंगाधर देशमुख यांनी केले. गीत सीमा मनुरकर व स्वाती जैन यांनी सादर केले. तर सूत्रसंचालन सुदाम पालकर यांनी केले. आभार प्रदर्शन धान फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक नितीन खडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मराज जाडकर, सुमेधा मनसबदार, अमोल पिंगळे, सुनीता वाघमारे, अनिता कवठेकर, प्रेमलता सोनवणे, सुरेखा खडके, संगीता सुतार आदींनी परिश्रम घेतले.
===Photopath===
120321\044212bed_18_12032021_14.jpg
===Caption===
महिला दिन उत्साहात