गॅस सिलिंडरची हजारी वाटचाल : मोजावे लागतात ९११ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:31+5:302021-09-06T04:37:31+5:30

बीड : मागील वर्षभरापासून पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सामान्यांच्या जीवनमानावर होत आहे. इंधन दराचा ...

Thousands of Gas Cylinders Travel: Rs | गॅस सिलिंडरची हजारी वाटचाल : मोजावे लागतात ९११ रुपये

गॅस सिलिंडरची हजारी वाटचाल : मोजावे लागतात ९११ रुपये

Next

बीड : मागील वर्षभरापासून पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सामान्यांच्या जीवनमानावर होत आहे. इंधन दराचा भडका आता आठ-पंधरा दिवसांत वाढत आहे. १८ ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना ८८६ रुपये मोजावे लागत होते. मात्र, पंधरा दिवस होत नाही तोच पुन्हा २५ रुपयांची वाढ झाल्याने बीडमध्ये गॅस सिलिंडरसाठी आता ९११ रुपये मोजावे लागणार असून, दरवाढीची गती अशीच राहिली तर दिवाळीपर्यंत गॅस सिलिंडरचे दर एक हजाराहून जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट पार कोलमडत असून, महाईगाईची होरपळ वाढतच आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या. गॅस सिलिंडर महाग झाल्याने सामाजिक संघटना, पक्ष आंदोलने करीत असले तरी त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. लाकूड मिळत नाही, वीज महाग, त्यामुळे स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर एकमात्र पर्याय असल्याने ग्राहकही सिलिंडरसाठी पदरमोड करून पैसे मोजत आहेत. शहरीकरण वाढल्याने गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. महिनाभरात ५० रुपयांनी वाढ झालेली असताना आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा सवाल गृहिणी करीत आहेत.

दर महिन्याला नवा उच्चांक (ग्राफिक्स)

दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर

१ डिसेंबर - ६२०

१ जानेवारी - १०० ७२०

१ फेब्रुवारी - २५ ७४५

१ मार्च - ९० ८३५

१ एप्रिल - ०० ८३५

१ मे - -१० ८२४

१ जून - -१० ८२४

१ जुलै - ३६ ८६०

१ ऑगस्ट - २५ ८८५

१ सप्टेंबर - २५ ९१०

२) सबसिडी नावालाच

२०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २२५ रुपयांनी गॅस सिलिंडरचे भाव वाढले. वर्षाच्या सुरुवातीचे पाच महिने सोडल्यास त्यानंतर मात्र सबसिडी बंद झाल्यागत आहे. ५ ते ७ रुपये सबसिडी मिळते. २०२१ च्या जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत जवळपास २०० रुपयांची वाढ सिलिंडरच्या दरात झाली आहे. २१ महिन्यांत ४२५ रुपये वाढल्याने सर्वच घटकांतील ग्राहक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Thousands of Gas Cylinders Travel: Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.