एटीएम कार्डची अदलाबदल करून २७ हजाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 20:05 IST2019-12-05T20:02:34+5:302019-12-05T20:05:05+5:30
राजीव गांधी चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात घडली घटना

एटीएम कार्डची अदलाबदल करून २७ हजाराची फसवणूक
अंबाजोगाई : एटीएम कार्ड अदलाबदल करून सत्तावीस हजार पाचशे रुपये काढून घेत फसवणूक झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातल्या राजीव गांधी चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात घडली आहे. याप्रकरणी अजित अनंतराव भगत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित अनंतराव भगत यांच्याकडे त्यांचे वरिष्ठ सहाय्यक संतोष कोळी यांनी एटीएम कार्ड देऊन पैसे काढून आणायला सांगितले होते. भगत हे राजीव गांधी चौकातील पेट्रोल पंपावरील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम सेंटर मध्ये गेले. पैसे काढत असतांना उपस्थित अनोळखी माणसाने एटीएम पासवर्ड ऐकला. यानंतर त्याने भगत यांना, तुम्ही उलटे एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकले आहे असे म्हणून एटीएम कार्डची अदलाबदल केली. यानंतर संतोष कोळी यांच्या खात्यातील २७५०० रू शहरातीलच आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस कर्मचारी सुर्यवंशी अधिक करत आहेत.