‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर ! रात्रभर राहणार गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:06 AM2018-12-31T00:06:44+5:302018-12-31T00:07:34+5:30

नवीन वर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरूणाईसह बीडकर सज्ज झाले आहेत. जवळपास त्यांचे नियोजनही पूर्ण झाले आहे.

'Thirty First' is the glamor of police! Patrol will stay overnight | ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर ! रात्रभर राहणार गस्त

‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर ! रात्रभर राहणार गस्त

Next
ठळक मुद्देनवर्षाच्या स्वागताला बीडकर झाले सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नवीन वर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरूणाईसह बीडकर सज्ज झाले आहेत. जवळपास त्यांचे नियोजनही पूर्ण झाले आहे. असे असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी बीड पोलीस रात्रभर गस्त घालणार आहेत. शिवाय फिक्स पॉर्इंटवर फौजफाटा तैनात राहणार आहे. एकूणच ‘थर्टीफर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांचा ‘वॉच’ असणार आहे, तसे नियोजनही बीड पोलिसांनी केले आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि ‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री तरूण बेभान होऊन जल्लोष करीत असतात.
अनेक नागरिक मद्य प्राशन करतात तर काही जण धुम्रपान करतात. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होतो, शिवाय भांडणांचे प्रमाणही वाढते. हाच धागा पकडून बीड पोलिसांनी तगडे नियोजन केले आहे. ‘थर्टीफर्स्ट’ला रात्रभर पोलीस अधिकारी, कर्मचारी गस्त घालणार आहेत. तसेच ठिकठिकाणी बंदोबस्तही तैनात केला आहे.
नववर्षाच्या जल्लोषामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास थेट कारवाईचा बडगा उगारून तुरुंणागची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी नववर्षाचे स्वागत आदर्श पद्धतीने करावे, जल्लोषामुळे इतरांना काही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि त्यांना सहकार्य असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुखांनी केले आहे.
नियंत्रण कक्षातून पाहणी
बीड शहरासह इतर तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. बीडमधील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातून जल्लोषांवर नजर राहणार आहे. यासाठी विशेष पोलीस कर्मचारीही नियूक्त केले आहेत. तसेच इतर ठिकाणीही अशीच काहीसी परिस्थिती असेल.
वाहनचालकांची
होणार तपासणी
‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री ठिकठिकाणी पोलीस नाकाबंदी करणार आहेत. यावेळी मद्यपी वाहनचालकांची तपासणी केली जाईल. यासाठी यंत्रही पोलिसांनी मागविले आहेत. मद्यपी वाहनचालकांवर कारवाया केल्या जातील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
\\\
‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या दृष्टीने नियोजन केले आहे. तसेच बंदोबस्तही तैनात केला असून रात्रभर गस्त असणार आहे. जे कोणी गोंधळ घालतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर्वांनी नववर्षाचे स्वागत शांततेत आणि आदर्श पद्धतीने साजरी करावे. पोलिसांना सहकार्य करावे.
- जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक, बीड

Web Title: 'Thirty First' is the glamor of police! Patrol will stay overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.