शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांतच संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:08 IST

लग्नाळू तरुणांना शोधून फसवणूक करणारी टोळी, असा असतो त्यांचा प्लॅन?

बीड : मी अशिक्षित. दीड एकर खडकाळ जमीन. आमचे आयुष्यच ऊसतोडणीत गेले. आता २८ वर्षांचा झालो. दोन-तीन वर्षांपासून लग्नासाठी बायको पाहतो, पण भेटलीच नाही. मजूर असलो म्हणून काय झाले. मी पण माणूसच. मलाही बायको पाहिजे ना? म्हणूनच बायकोसाठी तीन लाख रुपये दिले. परंतु आमचा संसार दोन दिवसांचाच राहिला आणि बायको निघून गेली. पोलिसांनी तपास केल्यावर ती पाच वर्षांच्या एका मुलीची आई असल्याचे समजले. आता काय, पैसेही गेले आणि बायकोही. पुन्हा मी एकटाच... अशी व्यथा दोन दिवसांपूर्वी फसवणूक झालेल्या तरुणाने मांडली.

राहुल (नाव बदलले रा. वडवणी) याची घरची परिस्थिती गरीब. आई-वडील, मोठा भाऊ आणि राहुल हे सर्वच ऊसतोडणी करतात. मागील वर्षी कर्नाटकात गेल्यावर त्याची ओळख यमुनाबाई शिंदे (रा. सेलू, जि. परभणी) हिच्यासोबत झाली. राहुलने तिच्याजवळ बायको पाहिजे म्हणून आशा व्यक्त केली. त्याप्रमाणे ३१ मे रोजी यमुनाबाई हिने राहुलला कॉल करून सेलूला मुलगी पाहायला बोलावले. त्याच दिवशी मुलगी पसंद करून ते परत गावी आले. त्यानंतर १ जून रोजी मंदिरात विवाह लावला. दुसरा दिवस देवदर्शन झाल्यानंतर ३ जून रोजी सत्यनारायणाची पूजा झाली. पाहुणे जेवण करत होते. तेवढ्यात नवरीने मैत्रिणीला कॉल करून त्रास होत असल्याचे सांगितले. काही क्षणातच पोलिस घरी आले. त्यानंतर सर्व चौकशी केली असता, नवरी आणि तिचे नातेवाईक बनावट असल्याचे समजले. त्यावरून वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

काेणाचा काय रोल?नवरी - वैभवी राम शेटे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मध्यस्थी - यमुनाबाई शिंदे (रा. सेलू, जि. परभणी), नवरीचे काका - मावशी - उमेश राठोड, चंदा उमेश राठोड (रा. अकोला), वाहन चालक - रणजीत उत्तम आहेर, नवरीची मैत्रीण - मनीषा नरेंद्र नन्नवरे (दोघेही रा. संगमनेर)

राठोड दाम्पत्यास अडीच, तर मध्यस्थीला ५० हजार३१ मे रोजी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर १ जून रोजी राठोड दाम्पत्य आणि यमुनाबाई शिंदे हे राहुलच्या घरी आले. दुपारच्या सुमारास यमुनाबाईकडे ५० हजार, तर राठोड दाम्पत्याने अडीच लाख रुपये घेतले. त्यांच्यासोबत वैभवीदेखील होती. तिला सोडून बाकीचे परत गेले. हे सर्व पैसे मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते. आगामी हंगामात ऊसतोडणी करून ते परत करणार होताे, असे राहुल म्हणाला.

या टोळीचा काय असतो प्लॅन?लग्नाळू तरुणांना शोधायचे. त्यांच्या नातेवाइकांना संपर्क साधून भावनिक करायचे. नंतर लग्न करून एक-दोन दिवस सासरी थांबायचे. नंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचे सांगून पैसे उकळायचे. जर हे यशस्वी झाले नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत, असे म्हणून पोलिस ठाणे गाठायचे. या प्रकरणातही वैभवीने मैत्रीण मनीषाला असेच सांगून बोलावून घेतले होते. परंतु सर्वांची वेगवेगळी चौकशी केल्याने या टोळीचा भांडाफोड झाला. आता चौघेजण पोलिस कोठडीत आहेत, तर राठोड दाम्पत्य फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याmarriageलग्न