मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू, गुन्हा दाखलसाठी नातेवाईकांचाा जिल्हा रूग्णालयात ठिय्या

By सोमनाथ खताळ | Updated: May 4, 2023 22:04 IST2023-05-04T22:04:16+5:302023-05-04T22:04:24+5:30

यामुळे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

The rickshaw puller died in the beating, the relatives were aggitaion in the district hospital for filing a case | मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू, गुन्हा दाखलसाठी नातेवाईकांचाा जिल्हा रूग्णालयात ठिय्या

मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू, गुन्हा दाखलसाठी नातेवाईकांचाा जिल्हा रूग्णालयात ठिय्या

बीड : रिक्षाचालकाला मारहाण करून चऱ्हाटा गावाजवळ टाकले. बेशुद्धावस्थेत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. दोन दिवस उपचार केल्यानंतर गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात मारहाण करणाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात रात्री साडे नऊ वाजता ठिय्या मांडला होता. यामुळे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दत्ता दिनकर उबाळे (वय २५ रा.चऱ्हाटा ता.बीड) असे मयताचे नाव आहे. दत्ता हा रिक्षााचालक आहे. १ मे रोजी सकाळी त्याचा आणि इमामपूर (ता.बीड) येथील काही तरूणांच वाद झाला होता. यात त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर रात्री ११ वाजता त्याला रिक्षासहीत चऱ्हाटा गावाजवळ आणून टाकण्यात आले. नातेवाईकांनी त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी याचा अहवाल बीड ग्रामीण पोलिसांनाही दिला.

परंतू गुन्हा दाखल झाला नव्हता. आता गुरूवारी रात्री ८ वाजता दत्ताचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक होत रात्री साडे नऊ वाजता जिल्हा रूग्णालयात गर्दी करत ठिय्या मांडला. तसेच जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्राही त्यांनी घेतला. रात्री १० वाजेपर्यंत सर्व नातेवाईक रूग्णालयातच होते.

या प्रकरणाची माहिती घेत आहोत. संशयितांना ताब्यात घेण्यासह इतर काही चौकशी केली जाईल. त्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाणार आहे. आम्ही याच प्रकरणात आहोत.- संतोष साबळे, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे बीड

Web Title: The rickshaw puller died in the beating, the relatives were aggitaion in the district hospital for filing a case

टॅग्स :Beedबीड