शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पुढारी, अधिकाऱ्यांचे फोटोसेशन संपलं; रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही; लिंबागणेशचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:56 IST

'पुढारी-अधिकारी फक्त फोटो काढून जातात'; रस्ता खचल्याने लिंबागणेशच्या ग्रामस्थांचा संताप

लिंबागणेश (दि.२७) : बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड रस्ता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचून वाहतूक ठप्प झाली आहे. दुध-दुभते, भाजीपाला, शेतीमाल बाजारात नेणे, तसेच आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार संदिप क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांच्यासह गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी साइट व्हिजिट करून फोटोसेशन केले, मात्र १३ दिवस उलटून गेले तरी दुरुस्तीची कामे सुरूच झाली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः वाहून गेलेले रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने जिल्हा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांचा रोषमनोहर वाणी, सखाराम घोलप, अर्जुन घोलप, संतोष वाणी, विवेक बागल, विशाल घोलप, प्रकाश ढवळे, जनार्दन वाणी, रमेश घोलप, वैजनाथ वाणी, महावीर वाणी आदी ग्रामस्थांनी “पुढारी आणि अधिकारी फक्त फोटो काढून जातात, पण रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत” अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली.

रस्तारोकोनंतरही आश्वासन हवेत५ दिवसांपूर्वी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार संदिप क्षीरसागर, तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी जायभाये, तलाठी गणपत पोतदार व ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर यांनी “२ दिवसांत तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करू” असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन फक्त कागदावरच राहिले असून, आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी