केज ( बीड): वाल्मिक कराडने 29 नोव्हेंबर रोजी वाईनशॉप चालविण्यासाठी केज येथील एक इमारतीची खरेदी 1 कोटी 69 हजार रुपयाला केली होती. नगरपंचायतीने नियम डावलून खरेदी खताच्या चौथ्याच दिवशी या वॉइन शॉपला 2 डिसेंबर रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. या प्रकरणी अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर आज पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत हे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात करण्यात आल्याची माहिती आहे.
खंडणीच्या गुन्ह्यात मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मिक कराडला मकोका लागू झाल्यामुळे बुधवारी सकाळी बीड येथील जिल्हा कारागृहातून एसआयटी अधिकाऱ्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी ताब्यात घेतले. त्यानंतर आज दुपारी 12: 05 वाजता केज पोलीस ठाण्यात आणताच अटक केली. त्यानंतर त्याला बीड येथील मकोका न्यायालयात हजर केले.
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर बुधवारी 12 : 15 त्याच्या हातांच्या बोटाचे ठसे घेऊन अटक प्रक्रिया पूर्ण करून अर्धा एसआयटी अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. दरम्यान, केज येथे मकोका न्यायालय नसल्यामुळे केज न्यायालायची परवानगी घेऊन त्याला बीड येथील मकोका न्यायालयात हजर करण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. वाल्मिक कराडला केजला आणल्या नंतर केज येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संशयित वाहनाची पोलिसांनी झडाती घेतली.
वाल्मिक कराडच्या वाईन शॉपचे नाहरकत रद्दवाल्मिक कराडने 29 नोव्हेंबर रोजी वाईन शॉप चालविण्यासाठी केज येथील एक इमारतीची खरेदी 1 कोटी 69 हजार रुपयाला केली होती. नगरपंचायतीने नियम डावलून खरेदी खताच्या चौथ्याच दिवशी या वॉइन शॉपला 2 डिसेंबर रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. या प्रकरणी अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर 15 जानेवारी 2025 रोजी च्या सर्व साधारण सभेत हे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक आसद खतीब यांनी लोकमतशी बोलताना दिली.