शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:24 IST

दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केलेली नाही. कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले.

दिंद्रुड (जि. बीड) : माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गत दोन वर्षांत विविध योजनांतर्गत आलेली रक्कम  मुख्याध्यापकाने स्वत:साठी वापरल्याचा  प्रकार  लक्षात आल्यानंतर ही रक्कम मुख्याध्यापकाकडून वसूल करीत ग्रामस्थांनी  शाळेतील वर्गखोल्या दुरुस्तीचे  बांधकाम केले.  येथील मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांनी सन २०२०-२१ या कार्यकाळात समग्र शिक्षा व पर्यावरण संदर्भातील योजनेतील एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास झोडगे व ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यानंतर नाकलगाव ग्रामस्थांनी मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. मात्र, याची दखल न घेतल्याने ११ जुलै रोजी शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी ग्रामस्थ व मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत घोटाळा केलेली सर्व रक्कम मुख्याध्यापकाने गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिली.  

बांधकाम केले -मुख्याध्यापकाने परत केलेले  ९० हजार रुपये गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी शाळेतीलच एका शिक्षकाच्या बँक खात्यावर वर्ग केले. पाच जणांची समिती नेमून त्या पैशांतून शाळेचे बांधकाम केले. कारवाई होणार का? -दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केलेली नाही. कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी