शनिवारी खचलेला पूल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायंकाळी पुन्हा वाहून गेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 19:14 IST2025-05-25T19:14:13+5:302025-05-25T19:14:22+5:30
पूल पुन्हा वाहून गेल्याने वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शनिवारी खचलेला पूल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायंकाळी पुन्हा वाहून गेला!
नितीन कांबळे/
कडा- बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड चिंचपुर या १७ किलोमीटर अंतराचे रखडलेले काम मागील अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. शेरी बुद्रुक येथील नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरता मातीच्या भरावाचा केलेलाूपुल शनिवारी दुपारी वाहून गेला. दुरूस्ती करून २२ तासानंतर पुन्हा दुरूस्त करून वाहतूक सुरळीत केली, पण सायंकाळी नदीला आलेल्या पाण्याने पूल पुन्हा वाहून गेल्याने वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर हा १७ किलोमीटर अंतराचा रस्ता रखडल्याने काही महिन्यांपुर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू झाले.पण हे काम अंत्यत संथ गतीने सुरू असल्याने शेरी बुद्रुक नदीवर नवीन पुल उभारण्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी नळकांडी वापरून तात्पुरता मातीचा भराव टाकून वाहनाची पर्यायी व्यवस्था केली होती.
शनिवारी झालेल्या पावसाने दुपारी हा पुल खचल्याने वाहतूक वळविण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रविवारी दुपारी परत पुलाची दुरूस्ती करून दुपारी वाहतूकीसाठी खुला केला.पण सायंकाळी नदीला आलेल्या पाण्याने पुन्हा पूल वाहून गेल्याने वाहन धारकांची मोठी अडचण निर्माण झाल्याने पुन्हा पहिल्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली. एखाद्याचा जीव गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग योग्य व्यवस्था करेल का? असा सवाल शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यानी उपस्थित केला आहे.