मेटे साहेब अमर रहे...अंत्यदर्शनाला रीघ, हुंदके अन् अश्रूंनी वातावरण सुन्न
By संजय तिपाले | Updated: August 15, 2022 10:53 IST2022-08-15T10:52:23+5:302022-08-15T10:53:15+5:30
लढवय्या, उमदा, तडफदार नेता म्हणून विनायक मेटे यांची ख्याती होती.

मेटे साहेब अमर रहे...अंत्यदर्शनाला रीघ, हुंदके अन् अश्रूंनी वातावरण सुन्न
बीड: शिवसंग्रामचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांचे पार्थिवदेह १५ ऑगस्ट रोजी सकाळी बार्शी रोडवरील निवसस्थानापासून नगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे आणले. यावेळी मेटे साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा,साहब तुम्हार नाम रहेगा.. अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी रांग लागली होती.
लढवय्या, उमदा, तडफदार नेता म्हणून विनायक मेटे यांची ख्याती होती. मराठा आरक्षणासाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या मेटे यांना आरक्षण प्रश्नी बैठकीला जाताना १४ ऑगस्ट रोजी पहाटे काळाने गाठले. त्यामुळे राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते शोकसागरात बुडाले. १५ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिवदेह अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात आले. विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, समर्थक व नागरिक उपस्थित होते.