शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अंध पित्याला मुलाने बसस्टॅण्डवर सोडले,मात्र मुलीने स्वीकारले;आता शेवटचा श्वास जावयाच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:04 IST

तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या बसस्टॅण्डवर बेवारसपणे मुलाने पित्याला सोडून दिले होते.

शिरूर कासार (जि. बीड) : तालुक्यातील निराश्रित, गरीब, वृद्ध अपंग अशा उपेक्षितांना सांभाळ करणाऱ्या आजोळ परिवारात तीन वर्षांपासून ९७ वर्षीय आजोबा आश्रयाला होते. नातेवाइकांची शोधमोहीम सुरूच होती. अखेर मुलाचा पत्ता सापडला. संपर्क करून वडिलांना घेऊन जा, असे सांगितले. परंतु त्या एकुलत्या एक मुलाने पित्यास नाकारले. यानंतर दुसऱ्या नातेवाइकांचा शोध सुरू केल्यावर आजोबांच्या मुलीचा शोध लागला. मुलीला हकिकत सांगितली आणि तिने पित्याला स्वीकारले. रविवारी ती आजोबांना घरी घेऊन गेली.

तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या बसस्टॅण्डवर बेवारसपणे मुलाने पित्याला सोडून दिले होते. मात्र अंध असल्याने बसस्टॉपवर असलेल्या काही माणुसकी जिवंत असणाऱ्यांनी विचारणा केली असता मला माजलगावच्या गाडीत बसून द्या, अशी विनंती केली. त्यांनी आजोबांना तिकीट काढून गाडीत बसवून दिले. तेव्हापासून अंध आजोबा बसस्टॅण्डवरच असायचे. मिळेल ते खायचे. तिथेच कोपऱ्यात झोपायचे. अशावेळी माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामराव देशमुख यांच्या माध्यमातून त्यांना आजोळ परिवारात आणले.

आजोबाच्या नातेवाइकांचे शोधकार्य सुरू झाले. मुलाचा पत्ता मिळाला. त्यांच्याशी संपर्क केला मात्र तो एकुलता एक मुलगा स्पष्टपणे नकार देऊन मोकळा झाला. हताश न होता आजोळ परिवाराचे संचालक कर्ण तांबे यांनी प्रयत्न करून दुसरे नातेवाईक शोधले. त्यानंतर ५७ वर्षीय सीता शिंदे या मुलीने आपल्या बापाचा स्वीकार केला आणि ती स्वत: येऊन रविवारी खराडी पुणे येथे घेऊन गेली.

सीता बनली वडिलांचा आधारमुलाने नाकारले. एका मुलीने तर माझा नंबर ‘आजोळ’ला देऊच नको, असे सीताला खडसावले. मात्र सीताने आपल्या वडिलांच्या आधाराची काठी होण्याचा निश्चय केला. आता ते आजोबा जावयाच्या घरी सुखाने शेवटचा श्वास घेणार आहेत. हा सर्व प्रवास आई, वडिलांना निश्चित काही शिकवून जातो. अशी वेळ कुण्याही मुलाने जन्मदात्यावर आणू नये. त्यांची सेवा करा, निश्चित चांगले फळ मिळेल, असे आवाहन आजोळ परिवाराचे संचालक कर्ण तांबे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक