कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे

By सोमनाथ खताळ | Published: October 30, 2023 05:23 PM2023-10-30T17:23:55+5:302023-10-30T17:24:17+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण केले जात आहे.

The Beed Collector, Panchayat Samiti office was locked and locked while evacuating the employees | कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे

कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे

बीड : मराठा आरक्षणाची मागणी करत समाजबांधव आक्रमक झाले आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास बीड जिल्हाधिकारी कार्यालय आणि बीड पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी बाहेर काढले. त्यांना कामबंद ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण केले जात आहे. या ठिकाणी विविध समाज, क्षेत्रातील लोक येऊन आंदाेलकांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासाठी पाठिंबा देत आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा इशाराही या आंदोलकांनी दिला आहे.

Web Title: The Beed Collector, Panchayat Samiti office was locked and locked while evacuating the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.